Tap to Read ➤
'या' पद्धतीने लिंबू पाणी प्या, वजन कमी होणारच!
लिंबू पाणी पिऊनही वजन कमी होत नाही असा तुमचाही अनुभव असेल तर दिलेली पद्धत वापरून बघा, फायदा होईल!
अनेक जण रोज सकाळी नियमितपणे लिंबू पाणी पितात. शरीराला त्याचे इतर लाभ होतात पण वेट लॉस काही होत नाही.
लिंबू पाण्यात साखर, मध, मीठ यापैकी काहीही न घालता फक्त लिंबाचा रस आणि कोमट पाणी एकत्र करून प्या, वेट लॉस होईल.
वजन कमी करण्यासाठी दिवसातून दोन वेळा, सकाळी अंशपोटी आणि रात्री जेवण झाल्यावर बिना मिठाचे, साखरेचे लिंबू पाणी घ्या.
साखर, मीठ न घालता केलेल्या लिंबू पाण्यात फक्त ६ ग्रॅम कॅलरीज असतात. ज्या वेट लॉससाठी उपयुक्त ठरतात.
उन्हातून घरी आल्यावर मात्र लिंबाच्या सरबतात मोजक्या प्रमाणात काळे मीठ आणि साखर घालावे, चव येते आणि थकवा जातो.
मधुमेहाच्या रुग्णांनी साखर कमी झाली की झटपट उपाय म्हणून साखर घातलेले लिंबू पाणी प्या, लगेच फायदा होईल.
लिंबू फ्लेवरचे कोल्ड्रिंक म्हणजे लिंबू पाणी नव्हे, तर त्यात अनेक अतिरिक्त घटक समाविष्ट असतात, जे शरीराला घातक ठरतात.
इन्स्टंट एनर्जी बूस्टर म्हणून लिंबू पाणी प्यावे. अगदीच आळशी असाल तर लिंबाचा रस एका बरणीत काढून ठेवा आणि गरजेच्या वेळी वापरा.
लिंबू पाण्याची चव आणि गुणधर्म वाढवायचे असतील तर त्यात पुदिना आणि लिंबाच्या चकत्या टाका.
क्लिक करा