Tap to Read ➤

काकडी केव्हा आणि कशी खाणं अधिक चांगलं?

उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण काकडीमध्ये असणाऱ्या पाण्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.
तसेच काकडीमध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांमुळे त्वचाही तुकतुकीत राहण्यास मदत होते.
पण काकडीमधल्या पोषक गुणांचा शरीराला लाभ होण्यासाठी काकडी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाणं अधिक गरजेचं आहे.
रात्रीच्यावेळी काकडी खाल्ल्यामुळे अनेक जणांना कफचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रात्री काकडी खाणं टाळावं.
रात्री काकडी खाल्ल्यामुळे काही जणांना शांत झोप येत नाही.
काकडी रात्रीच्यावेळी खाल्ल्यामुळे अनेकांना अपचन, गॅसेस असे त्रास होतात.
काकडी सालांसकट खाणं अधिक फायदेशीर मानलं जातं.
क्लिक करा