Tap to Read ➤

पुरी टम्म फुगण्यासाठी १ सोपी ट्रिक- तळताना करा 'ही' खास गोष्ट...

पुऱ्या टम्म फुगाव्या यासाठी नेमकं काय करायला हवं, याची एक अतिशय सोपी ट्रिक आता आपण पाहणार आहोत.
पुरी भाजी हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. पण बऱ्याचदा पुऱ्या चांगल्या फुगतच नाहीत.
कणिक व्यवस्थित मळूनही पुऱ्या जर फुगल्या नाहीत, वातड झाल्या तर जेवणाची मजाच जाते.
त्यामुळे आता पुऱ्या तळताना काय करायचं जेणेकरून त्या अगदी छान फुगतील ते आपण पाहूया..
पुरी जेव्हा तुम्ही कढईमधल्या तेलामध्ये सोडता तेव्हा ती थोडीशी तळून झाल्यानंतर तिच्या वरच्या बाजुला झाऱ्याने थोडा दाब द्या.
पुऱ्यांवर हलकासा दाब देऊन त्या तळल्या की त्या खूप छान फुगतात. एकदा करून पाहा..
क्लिक करा