Tap to Read ➤

शेअर बाजारातील खेळाडू आहेत Shashi Tharoor, 'यात' कोट्यवधींची गुंतवणूक

शशी थरुर हे शेअर बाजारातीलही दिग्गज खेळाडू आहेत.
काँग्रेसचे दिग्गज नेता शशी थरुर हे केवळ राजकारणातीलच नाही तर, शेअर बाजारातीलही दिग्गज खेळाडू आहेत.
शशी थरुर यांनी लोकसभा २०२४ साठी तिरुवनंतपुरमहून आपला अर्ज दाखल केला आहे.
त्यांनी दिलेल्या अॅफिडेव्हिटनुसार शशी थरुर हे एक मोठे गुंतवणूकदार असल्याचंही दिसून येतंय.
अॅफिडेव्हिटनुसार थरुर यांनी २३ निरनिराळ्या स्कीम्समध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे.
मार्च २०२४ पर्यंत त्यांनी जवळपास १.७२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांनी २० पेक्षा जास्त म्युच्युअल फंडात पैसा गुंतवलाय.
त्यांनी फ्रॅकलिन टेपंलटन म्युच्युअल फंडाच्या पाच फंडात ३.७२ लाखांची गुंतवणूक केलीये.
याशिवाय त्यांनी अॅक्सिस, आयसीआयसीआय, कोटक, मिराई असेट्सच्या म्युच्युअल फंडातही पैसे गुंतवलेत.
क्लिक करा