हृदयाशी संबधित 5 गंभीर आजार; जाणून घ्या

भारतासह जगभरात हृदयरोगाशी संबंधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

हार्ट डिजीजचे प्रमाण भारतात आणि जगभर झपाट्याने वाढत आहे. प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये दिसणारी समस्या आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसतेय.

बदलती जीवनशैली, ताण, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव ही मुख्य कारणे आहेत. डायबिटीज, बीपी, स्थुलपणा आणि हाय कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांना जास्त धोका आहे.

कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल तर जोखीम आणखी वाढते. धूम्रपान, मद्य, जंक फूड, ताण, झोपेची कमतरता व शारीरिक निष्क्रियता हे मोठे रिस्क फॅक्टर्स आहेत.

कोरोनरी आर्टरी डिजीज (CAD): हार्टच्या रक्तवाहिन्या ब्लॉक/संकरी होतात.

हार्ट अटॅक: रक्तपुरवठा थांबल्याने अचानक छातीत तीव्र वेदना, घाम, श्वास घेण्यास त्रास.

अरिदमिया: हृदयाचे अनियमित ठोके. खूप जलद, मंद किंवा असामान्य होतात.

हार्ट फेल्युअर: हृदय पुरेसे रक्त पंप करू शकत नाही, त्यामुळे जीवाचा धोका आहे.

हाय ब्लड प्रेशर: "सायलेंट किलर". लक्षणे न दिसता हृदय व रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवते.

बचावासाठी रोज किमान ३० मिनिटे व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप, योग/मेडिटेशन आवश्यक आहे.

Click Here