उंबराचं एक फळ खा अन् पोटाच्या समस्यांना करा Bye Bye!

उंबराच्या फळासकट त्याची साल, झाडाची पानेदेखील गुणकारी आहेत.

उंबराच्या झाडाचं अध्यात्मिक महत्त्व किती आहे हे काही वेगळं सांगायला नको. 

श्री दत्तगुरुंचा वास असलेलं हे वृक्ष प्रचंड गुणकारी आहे. त्यामुळेच उंबर खाण्याचे शारीरिक फायदे काय ते पाहुयात.

शरीराची दाह होत असेल तर उंबराच्या सालीचा काढा करावा. या काढ्यात वेलची आणि खडीसाखर टाकून त्याच सरबत करावं. यामुळे शरीराची दाह कमी होते.

जखम झाल्यास उंबराच्या काढ्याने जखम धुवावी. यामुळे जखम वेगाने भरते. तसंच सूजदेखील कमी होते.

जर एखाद्या व्यक्तीला भस्मक (सारखी भूक लागणे) हा आजार झाला असेल तर त्यावेळी उंबराचं साल दुधात घोटून ते प्यायला द्यावं.

किटकदंश, विंचूदंश झाल्यास झाडाची पाने वाटून लावल्यास, दाह, वेदना, कमी होतात. 

अंगात ताप असेल तर उंबराचं फळ खावं.(वरील माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. याविषयी लोकमत कोणताही दावा करत नाही.)

धान्यांमध्ये कीड लागू नये म्हणून करा ‘हे’ घरगुती उपाय

Click Here