Tap to Read ➤
गुढीपाडवा ते रामनवमी ९ लवंगाचा पॉवरफुल उपाय!
गुढी पाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते शिवाय रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरी केले जाते, या काळात दिलेले उपाय प्रभावी ठरतील.
नवरात्र अर्थात ऊर्जेचा काळ, चैत्रात वसंत ऋतूचे आगमन आणि मोगरा, आंबा, सोनचाफ्याबरोबर आनंदाचा, उत्साहाचा संचार होतो.
वातावरणातील नकारात्मक शक्ती दूर करून सकारात्मकता निर्माण करण्यासाठी ज्योतिष शास्त्राने लवंगीचे उपाय दिले आहेत.
आर्थिक समस्या दूर करण्यासाठी चैत्र नवरात्रीत रोज दोन लवंगा देवीला अर्पण करा.
आर्थिक वाढीसाठी लाल कापडात ९ लवंगा बांधून त्या देवीच्या पायाशी लावून नंतर तिजोरीत ठेवा.
कर्जमुक्तीसाठी नवरात्रीचे नऊ दिवस दिव्याच्या तेलात एक लवंग टाकून जाळा.
नोकरी किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी नऊ दिवस तीन लवंगांची पूड करून त्याचे गंध लावा.
नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वाराजवळ रोज दोन लवंगा जाळून टाका.
इच्छापूर्तीसाठी रोज एक लवंग हातात घेऊन देवीसमोर इच्छा प्रगट करा आणि ती लवंग देवीच्या पायाशी अर्पण करा.
कौटुंबिक सुख आणि शांतीसाठी लवंग उपाय देवघरातील दिव्यात तीन लवंगांची पूड करून टाका.
सुदृढ आरोग्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांत अंघोळीच्या पाण्यात लवंगीचे तेल घालून स्नान करा.
लहान मुलांची वा इतर कोणाची दृष्ट काढायची असेल तर मीठ मोहरी बरोबरच लवंगीनेही दृष्ट काढा आणि ती एकत्र जाळून टाका.
क्लिक करा