कढईवरचे काळे डाग घालवण्याच्या सोप्या ट्रिक्स

कढईवरील काळा थर काढण्याच्या काही सोप्या युक्त्या पाहुयात.

बऱ्याचदा कढई वारंवार वापरल्यामुळे तिचा तळ काळा होतो. कढईवर जमा झालेला हा काळा थर इतका जाड असतो की तो सहजासहजी निघत नाही.

कढईवरील काळा थर काढण्याच्या काही सोप्या युक्त्या पाहुयात.

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करुन ही पेस्ट कढईवर लावा. या पेस्टने कढई घासा आणि १० मिनिटाने कढई स्वच्छ धुवा.

व्हिनेगर किंचित गरम करुन त्यात मीठ मिक्स करा. ही पेस्ट कढईला लावून घासा.

गरम पाण्यात डिशवॉशर लिक्विड  मिक्स करा. त्यानंतर या पाण्यात कढई भिजवून ठेवा.

कढईचा चिकट काळपटपणा काढण्यासाठी मीठामध्ये बटाट्याचं साल मिक्स करुन त्याने कढई घासा.

डॉक्टरांचे हस्ताक्षर एवढे वाईट का असते?

Click Here