'या' तीन टीप्स फॉलो केल्या तर मुलं स्वत:हून करतील Home work 

मुलं Home work करायला कंटाळा करतात? 

मुलांच्या शाळेचा होमवर्क घ्यायचा म्हटलं की पालकांना त्याचं टेन्शनचं येतं.कारण, अभ्यास करायला मुलं कधीच तयार नसतात.

पॅरिंटिंग कोच पुष्पा शर्मा यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत मुलांना होमवर्क करण्यासाठी कसं तयार करायचं याच्या टीप्स दिल्या आहेत.

आधी मुलांचं म्हणणं काय आहे ते ऐका. जर मुलांना त्यावेळी अभ्यास करायचा नसेल तर त्यांच्या आवडीनुसार, ते सांगतील त्यावेळी त्यांचा अभ्यास घ्या.

मुलं अभ्यास करतांना त्याच्यासोबत बसा. त्यांना अडलेले प्रश्न सोडवायला मदत करा. किंवा मुलांना ब्रेक हवा असेल तर तो त्यांना द्या.

सुरुवातीला मुलांना थोडा थोडा अभ्यास करु द्या. एकदम त्यांच्यावर बर्डन टाकू नका. टप्याटप्प्याने त्यांना अभ्यास करु द्या. ज्यामुळे त्यांना कंटाळा येणार नाही.

जर मुलांना एकदा कळलं की अभ्यास करतांना पालक बंधनात ठेवत नाहीये. किंवा, त्यांच्या कलाकलाने घेत आहेत. तर, मुलं आपोआप स्वत:हून अभ्यास करायला लागणार.

चाळीशीनंतर आई झालेल्या बॉलिवूडच्या सुपरमॉम्स..

Click Here