Tap to Read ➤

केवळ गुरुवारी नाही, दररोज म्हणा ‘हे’ स्वामी मंत्र; किती वेळा करावा जप?

रविवार ते शनिवार या वारांनुसार स्वामींचे मंत्र म्हणा अन् प्रचंड गुरुबळ मिळवा
प्रामुख्याने गुरुवार हा श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष पूजा, उपासना, नामस्मरण यासाठी सर्वोत्तम मानला जातो.
दररोज वारानुसार म्हणजेच रविवार ते शनिवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचे त्या त्या दिवसाप्रमाणे दिलेले मंत्र म्हणणे शुभ फलदायी ठरू शकते.
हे मंत्र त्या त्या दिवसांनुसार किती वेळा जपावेत, हेही सांगितले गेले आहे. याने स्वामींचे गुरुबळ पाठीशी राहू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगतात.
रविवार: या दिवसावर सूर्याचा अंमल असतो. या दिवशी ॥श्री स्वामी समर्थ नम:॥ या मंत्राचा २१ वेळा जप करावा.
सोमवार: या दिवसावर चंद्राचा अंमल असतो. या दिवशी ॥ॐ श्री स्वामी समर्थ - नमो नम:॥ या मंत्राचा २१ वेळ जप करावा.
मंगळवार: या दिवसावर मंगळाचा प्रभाव असतो. या दिवशी ॥ॐ स्वामी ॐ॥ या मंत्राचा २१ वेळा जप करावा.
बुधवार: या दिवसावर बुधाचा अंमल असतो. या दिवशी ॥ॐ स्वामी समर्थ नमो नम:॥ या मंत्राचा २१ वेळा जप करावा.
गुरुवार: या दिवसावर गुरुचा अंमल असतो. या दिवशी ॥गुरुदेव दत्त - स्वामी समर्थ॥ हा मंत्र २१ वेळा जपावा.
शुक्रवार: या दिवसावर शुक्राचा प्रभाव असतो. या दिवशी ॥ॐ स्वामी समर्थ ॐ॥ या मंत्राचा २१ वेळा जप करावा.
शनिवार: या दिवसावर शनीचे अधिपत्य असते. या दिवशी ॥भगवान श्री स्वामी समर्थ॥ हा मंत्र २१ वेळा जपावा.
आपण स्वामींची करत असलेली साधना, नामस्मरण, उपासना सुरू ठेवावी. शक्य असल्यास यथाशक्ती या मंत्राचा जप करावा.
- ही माहिती सामान्य गृहीतके, मान्यतांवर आधारित आहे. यासंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
क्लिक करा