Tap to Read ➤

आजपासून होतील 'हे' ४ मोठे बदल, थेट तुमच्यावर होणार परिणाम

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला कोणते ना कोणते बदल होत असतात.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला कोणते ना कोणते बदल होतात. त्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या खिशावर होतो.
१ नोव्हेंबर रोजी कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली. यामध्ये १०१ रुपयांची वाढ झाली.
आजपासून ४ प्रमुख वित्तीय बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम नागरिकांवर होणार आहे.
१. बंद एलआयसी पॉलिसी सुरू करणे : पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबरला संपली. यात विलंब शुल्कात ३० टक्क्यांपर्यंत सवलत होती.
२. जीएसटी चालान : १०० कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक उलाढाल असलेल्यांना १ नोव्हेंबरपासून ३० दिवसांच्या आत ई-चालान जीएसटी पोर्टलवर अपलोड करावे लागेल.
३. डेरिव्हेटिव्ह व्यवहारांवर जास्त शुल्क : इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये १ नोव्हेंबरपासून जास्तीचे देवघेव शुल्क भरावे लागेल. हा बदल एसअँडपी बीएसई सेंसेक्स ऑप्शन्सवर लागू असेल.
४. विमा पॉलिसीसाठी केवाईसी : १ नोव्हेंबरपासून सर्व विमाधारकांना केवायसी करणे बंधनकारक होईल. केवायसी नसल्यास कंपन्या खर्चासंबंधीचे दावे फेटाळू शकतात.
क्लिक करा