डिसेंबरपर्यंत पूर्ण करा ही कामं; अन्यथा होईल नुकसान
जर तुमची काही महत्त्वाची कामं असतील तर ती लवकट आटोपून घ्या.
डिसेंबर म्हणजे २०२३ या वर्षाचा अखेरचा महिना. तसंच अनेक फायनान्शिअल डेडलाईन्स असलेला हा महिना आहे. जर तुमची काही महत्त्वाची कामं असतील तर ती लवकट आटोपून घ्या.
UIDAI च्या वेबसाईटनुसार जर तुम्ही १० वर्षांमध्ये आपल्या आधार डिटेल्स अपडेट केल्या नसतील तर १४ तारखेपर्यंत तुम्ही त्या मोफत अपडेट करू शकाल.
एसबीआय होम लोनवर ०.६५ बेसिस पॉईंट्सची सूट मिळत आहे. ही ऑफर होम लोन, फ्लेक्सिपे, एनआरआय, नॉन सॅलराईडवर लागू आहे.
एनसीपीआयनं गुगल पे, फोन पे, पेटीएमसारख्या पेमेंट्स अॅपना वर्षभरापासून अॅक्टिव्हेट नसलेल्या युपीआय आयडींना बंद करण्यास सांगितलंय. यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे.
रिझर्व्ह बँकेनं लॉक अॅग्रीमेंटसाठी ३१ डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे. जर तुम्ही अपडेटेड बँक लॉकर अॅग्रीमेंट सबमिट केलं तर पुन्हा एकदा सही करून ते जमा करावं लागणार आहे.
विद्यमान डीमॅट अकाऊंट होल्डर, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना आपल्या डीमॅट नॉमिनी अॅड करण्यासाठी ३१ डिसेंबर ही अखेरची तारीख आहे.
स्टेट बँकेनं आपल्या विशेष अमृत कलश एफडीची तारीख वाढवून ३१ डिसेंबर केली आहे.