IND vs BAN: हिटमॅन पाठोपाठ लागतो गांगुलीचा नंबर; सिक्सरचा खास रेकॉर्ड
एक नजर वनडेत बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या चार फलंदाजांवर
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या लढतीनं चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या हंगामाला सुरुवात करणार आहे.
या सामन्याआधी नजर टाकुयात बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यात भारताकडून सर्वाधिक षटकार मारण्यात आघाडीवर असलेल्या ४ फलंदाजांच्या रेकॉर्ड्सवर
बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड हिटमॅन रोहित शर्माच्या नावे आहे. त्याने १७ वनडेत २७ षटकार मारले आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा नंबर लागतो. त्याने बांगलादेशविरुद्धच्या १० वनडे सामने खेळताना १६ षटकार ठोकले आहेत.
बांगलादेशविरुद्ध वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहली ११ सिक्सरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. जे त्याने १६ सामन्यात मारले आहेत.
ईशान किशन बांगलादेशविरुद्ध एकच वनडे सामना खेळलाय. या सामन्यातील द्विशतकी खेळीमध्ये त्याने १० षटकार मारले होते.
रोहित शर्मानं बांगलादेशविरुद्धच्या १७ वनडेत ७८६ धावा केल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत धावांसह षटकारांचा रेकॉर्ड करण्याची संधी त्याच्याकडे असेल.