Tap to Read ➤

Shreya Bugde : 'गौराई आली अंगणी...'

मराठी सिनेसृष्टीची 'कॉमेडी क्वीन' अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे.
गौरी आगमनाच्या निमित्ताने श्रेया बुगडेने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळते आहे.
लाडक्या गणरायापाठोपाठ माहेरवाशीन गौराईच्या स्वागतासाठी सर्वत्र लगबग सुरू झाली आहे.
अशातच 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेच्या व्हायरल फोटोंनी लक्ष वेधलं आहे.
पैठणी साडी अन् त्यावर पारंपरिक साज करून श्रेया गौराईच्या स्वागतासाठी नटली आहे.
'गौराई आली अंगणी... 'असं कॅप्शन देत तिने हे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
अभिनेत्रीचा असा ट्रेडिशन लूक पाहून नेटकरी तिच्या प्रेमातच पडले आहेत.
फोटोंमधील श्रेयाचा मराठमोळा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.
क्लिक करा