Tap to Read ➤

होळीच्या रंगापासून कारचा कलर वाचवा, नाहीतर हजारोंचे होईल नुकसान

सोसायट्या, रस्त्यांवर लावलेल्या गाड्याही रंगात रंगणार आहेत. तुमच्या शरीराचा रंग बदलवतातच परंतू वाहनांचा रंगही बदलून टाकण्याची क्षमता त्यात असते.
होळीचा सण आला आहे. १३, १४ मार्चला साजरा केला जाणार आहे. अशातच सोसायट्या, रस्त्यांवर लावलेल्या गाड्याही रंगात रंगणार आहेत.
आता बाजारात खूप तीव्र रंग येतात, जे तुमच्या शरीराचा रंग बदलवतातच परंतू वाहनांचा रंगही बदलून टाकण्याची क्षमता त्यात असते.
तु्म्ही पार्क केलेली कार या रंगापासून कशी काय वाचविता येईल? या रंगांमुळे कारच्या रंगाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यापासून वाचण्यासाठी काही टिप्स आहेत...
होळीच्या रंगांपासून गाडीचे संरक्षण करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ती चांगली झाकून ठेवणे. त्यासाठी कव्हर लागणार आहे.
कारचा रंग सुरक्षित ठेवण्यासाठी, तुम्ही कार झाकलेल्या पार्किंगमध्ये पार्क करू शकता. ही जागा होळी खेळण्याच्या जागेपासून लांब असेल तर उत्तम.
कव्हर पार्किंगचा पर्याय नसेल तर तुम्ही तुमची कार काही काळ अशा ठिकाणी पार्क करू शकता जिथे होळीचा रंग उडू शकणार नाही. प्रत्येकाच्या घराजवळ अशी सुरक्षित ठिकाणे असतात जिथे कोणीही सहज येत-जात नाही.
वरील एकही गोष्ट जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या गाडीच्या रंगावर चांगल्या दर्जाचे वॅक्स लावू शकता. गाडीच्या रंगावर एक सुरक्षित पृष्ठभाग तयार होतो आणि होळीच्या रंगांचा गाडीवर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
क्लिक करा