Tap to Read ➤

शिक्षक ते कॅनडाचे पंतप्रधान, पाहा किती आहे जस्टिन ट्रुडो यांचं नेटवर्थ

ट्रुडो हे एक शिक्षण म्हणून कार्यरत होते, हे फार कमी लोकांना माहित आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचं नाव आता सर्वांनाच माहित असेल. भारतावर आरोप केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.
जस्टिन ट्रुडो यांचा प्रवास एक शिक्षक ते कॅनडाचे पंतप्रधान असा होता. पाहूया आज त्यांच्याकडे किती आहे संपत्ती.
जस्टिन ट्रुडो २०१५ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले. त्यानंतर आतापर्यंत तेच पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. ते एक शिक्षकही होते हे फार कमी लोकांना माहित आहे.
२००८ मध्ये ट्रुडो लिबरल पार्टीत आले आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांचं वार्षिक वेतन ३७९००० डॉलर्स म्हणजेच जवळपास ३.१५ कोटी रुपये आहे.
ट्रुडो यांना ३७४ कोटी रुपयांची वडिलोपार्जित संपत्तीही मिळाली. त्यांनी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे.
याशिवाय त्यांनी जागतिक कंपन्यांच्या शेअर्समध्ये ७ मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्यांनी रियल इस्टेटमध्ये २० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केलीये. त्यांच्याकडे ३ मिलियन डॉलर्सच्या २ यॉट आहेत.
ट्रुडो यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर ते देशातील श्रीमंत राष्ट्राध्यक्षांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे एकूण मिळून ८०६ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
क्लिक करा