विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचे २ वर्ल्ड रेकॉर्ड मोडू शकतो जो रुट, पण...
इंग्लिश बॅटरनं कोहली, स्मिथसह विल्यमसनला टाकले मागे
इंग्लंचा बॅटर जो रुट याने ३३ व्या कसोटी शतकासह विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियम्सन या स्टार क्रिकेटर्संना मागे टाकले आहे.
फॅब 4 मध्ये नव्हे तर सक्रीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावे झाला आहे.
त्याच्या नजरा आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या दोन वर्ल्ड रेकॉर्डवर असतील.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा (१५९२१) वर्ल्ड रेकॉर्ड विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या नावे आहे.
रुट या विक्रमाचा अगदी वेगाने पाठलाग करतोय. १४५ कसोटी सामन्यात रुट १२, २७४ धावांचा पल्ला गाठला आहे. सातत्य कायम राखण्यात यशस्वी झाला तर तो पुढच्या चार-पाच वर्षांत सचिनचा हा विक्रम सहज मोडू शकतो.
कसोटीत सर्वाधिक ५१ कसोटी शतकांचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. हा विक्रमही जो रुटच्या टप्प्यात येऊ शकतो.
जो रुटला सचिनच्या कसोटी शतकांचा विक्रमही गाठता येईल. पण यासाठी किमान त्याला आणखी काही वर्षे अगदी याच तोऱ्यात खेळावे लागेल.