Tap to Read ➤

Byju's Downfall : माहितीये बायजूसमध्ये शिक्षकांना किती दिलं जातं वेतन?

कंपनीसमोर असलेलं रोखीचं संकट आता आणखी वाढत आहे.
एड्युटेक कंपनी बायजूस एकेकाळी देशातील युनिकॉर्न स्टार्टअप म्हणून नावारुपाला आलं होतं. परंतु आता रोखीचं संकंट अधिक वाढत आहे.
परिस्थिती अशी आहे की कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी फाऊंडर रवींद्रन बायजू यांना आपलं घर देखील गहाण ठेवावं लागलंय.
ब्लूमबर्गनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार रोखीचा सामना करणाऱ्या बायजूसकडे आपल्या कर्मचाऱ्यांचं वेतन देण्याइतकेही पैसे नाहीत.
आता रवींद्रन यांनी आपलीच प्रॉपर्टी नाही तर त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली संपत्तीही गहाण ठेवून पैसे उभारण्याचा पर्याय निवडलाय. पाहूया त्यांच्या शिक्षकांचं वेतन किती आहे.
बायजूसमध्ये शिक्षकांना ग्रेड आणि अनुभवानुसार वेतन दिलं जातं. परंतु सरासरी वेतन ४ लाख रुपये ते ७ लाख रुपये वार्षिक आहे.
ट्रेनिंगदरम्यान बायजूस आपल्या कर्मचाऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत वार्षिक वेतन देतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार एकेकाळी रवींद्रन यांचं नेटवर्थ ५ अब्ज डॉलर्स होतं. परंतु आता ते ३ बिलियन डॉलर्सपेक्षाही कमी आहे. कंपनीचं व्हॅल्युएशनही १६ महिन्यांत ८६ टक्क्यांनी घसरलंय.
क्लिक करा