Tap to Read ➤

जाहिरात पाहून विमा घेताय, थांबा...अन्यथा उद्भवू शकते मोठी समस्या

विमा संरक्षण घेताना अनेक बाबींची पडताळणी करणं आवश्यक असतं. अन्यथा तुमच्यासमोर मोठी समस्या उद्भवू शकते.
विमा खरेदी करताना सामान्यपणे सगळेजण संरक्षण मिळावं परंतु सोबत पैशांची गुंतवणूक व्हावी याचा विचार करत असतात.
दीर्घकालीन गुंतवणूक केल्यानं मिळणाऱ्या लाभांचा विचार करून कंपनीची निवड केली जात असते. परंतु कंपनीनं केलेल्या जाहिरातीच्या आधारे विमा घेणं योग्य ठरणार नाही.
जीवन विमा घेताना कंपन्यांनी नुकताच जारी केलेल्या क्लेम रेशो नक्कीच पाहा. त्यावरून तुम्हाला कळेल की, जेव्हा तुम्ही क्लेम किंवा दावा करता ही रक्कम झटपट मिळवून देण्याबाबत कोणत्या कंपनीचा इतिहास चांगला आहे.
कोणत्या कंपनीकडून दावा मिळवताना अनंत अडचणी येतात. तसंच कोणती कंपनी ही कामं कमीत कमी वेळात झटपट करून देत असते. नेमक्या अडचणीच्या काळात कंपनीनं अनेक शंकाकुशंका उपस्थित करून क्लेम मिळवून देण्यात खूप विलंब लावल्यास ती रक्कमही तुमच्यासाठी निरुपयोगी ठरण्याची भीती आहे.
निपटाऱ्याच्या प्रमाण ३० दिवसात ९५ टक्के असेल तर याचा अर्थ असा की दावा मिळाल्यानंतर महिनाभरात पॉलिसाधारकाकडून आलेल्या प्रत्येक १०० दाव्यांपैकी ९५ जणांना पैसे देण्यात आले.
हे प्रमाण जितके अधिक तितके कंपनीचे रेटिंग चांगले ठरते. हे प्रमाण कमी असणे म्हणजे सर्वाना दाव्याची रक्कम न मिळणे असा होतो. निपटाऱ्याचे प्रमाण कमी असणारी कंपनी पैसे देण्यास उशिर करते वा पैसे देणे नाकारते.
क्लिक करा