Tap to Read ➤

Budget 2024 : इन्कम टॅक्स रिजिममधील बदलानं करदात्यांना फायदा

१ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी बजेटमध्ये इन्कम टॅक्सच्या नव्या रिजिममध्ये अनेक बदल केले होते.
२०२० मध्ये सुरु केल्यानंतरही बहुतांश करदात्यांनी नव्या रिजिमकडे पाठ फिरवली होती.
याला चांगला प्रतिसाद न मिळाल्यानं २०२३ मध्ये निर्मला सीतारामन यांनी यात अनेक बदल केले होते.
त्यांनी नव्या रिजिममध्ये ५० हजारांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा देण्याची घोषणा केली.
नव्या रिजिममध्ये ७ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक इन्कमवर रिबेट वाढवण्यात आला.
महत्त्वाचं म्हणजे त्यांनी इन्कम टॅक्सच्या नव्या रिजिमला त्यांनी डिफॉल्ट रिजिम बनवण्याची घोषणा केली.
यामध्ये ३ लाखांपर्यंत कोणताही टॅक्स लागत नाही. १५ लाखांपेक्षा अधिक इन्कमवर ३० टक्के टॅक्स लागतो.
यामध्ये कोणतेही डिडक्शन किंवा एक्झमशन मिळत नाही. परंतु यात टॅक्स रेट कमी आहेत.
जे इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करत नाहीत, त्या करदात्यांसाठी नवी रिजिम अधिक फायदेशीर आहे.
क्लिक करा