Tap to Read ➤

BSNLचा सुपरहिट प्लॅन, ₹४८५ मध्ये ८२ दिवसांची वैधता; आणखी कोणते बेनिफिट

या प्लॅनमध्ये ग्राहकांना जबरदस्त बेनिफिट्स मिळत आहेत.
सरकारी दूरसंचार कंपनी BSNL आपल्या ग्राहकांना ८२ दिवसांचा प्लॅन ऑफर करत आहे.
बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स आणि फ्री डेटाचाही फायदा मिळतो.
जर तुम्हाला अधिक फायद्यासह बीएसएनएलचा प्लॅन घ्यायचा असेल तर ४८५ रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
बीएसएनएलच्या या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉल्स आणि दररोज १०० एसएमएस मिळतात.
बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ओटीटी अॅप्ससारख्या अॅड-ऑन सेवा उपलब्ध नाहीत. या प्लॅनसह ग्राहकांना लोकल आणि एसटीडी कॉलचाही फायदा मिळतो.
या प्रीपेड प्लानमध्ये युझरला एकूण १२३ जीबी डेटा मिळतो. अधिक डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन उपयुक्त ठरणार आहे.
याशिवाय, बीएसएनएलचा ५९९ रुपयांचा प्लॅन देखील आहे जो ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो.
क्लिक करा