Tap to Read ➤

इडल्यांचे हे ८ प्रकार तुम्ही खाल्ले आहेत का ?

ओटस, रवा, भाज्या, चटपटीत मसाले वापरुन एकाहून एक टेस्टी इडल्या ट्राय तर करुन बघा...
इडली उरल्यावर त्याचे काप करून मसाले लावून ती तेलात तळून त्याची फ्राइड इडली करु शकतो. ही कुरकुरीत इडली सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकतो.
डाळ - तांदूळ भिजवून पीठ करण्यासाठी वेळ नसल्यास आपण रवा आणि दही वापरुन इन्स्टंट रवा इडली झटपट बनवू शकतो.
इडलीच्या बॅटरमध्ये आपल्या आवडीचे व्हिजिटेबल बारीक चिरून घालून , मग त्याला मोहरीची फोडणी देऊन पौष्टिक व्हिजिटेबल इडली बनवू शकतो.
मिनी इडली ही आकाराने लहान असते. स्नॅक्स किंवा टी - टाइमसाठी मिनी इडली हा उत्तम पर्याय ठरु शकतो.
डाएटसाठी आपण ओट्सच्या पिठाचा वापर करुन हेल्दी ओट्स इडली बनवू शकतो. ग्लूटेन फ्री खाणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय ठरु शकतो.
सकाळचा ब्रेकफास्ट हेल्दी करण्यासाठी आपण बाजरीचे पीठ वापरुन झटपट होणारी बाजरा इडली बनवू शकतो.
मसालेदार स्पायसी शेजवान सॉसमध्ये इडली घोळवून तेलात खमंग तळून घ्यावी. चटपटीत खाण्याचा मूड झाल्यास आपण अशी इडली खाऊ शकतो.
मुगाच्या डाळीचे पीठ व दही एकत्र करुन त्याला मोहरी, जीरे, हिंग याची फोडणी द्यावी, या बॅटरपासून हेल्दी मुगाच्या डाळीची इडली बनवू शकतो.
क्लिक करा