स्टार्टअपमध्ये सेलिब्रेटी, स्टार्सचे किती कोटी? किती आहे गुंतवणूक
देशातील मोठमोठ्या सेलिब्रेटींनी स्टार्टअपमधील पैसे गुंतविणे सुरूच ठेवले आहे.
मागील दोन वर्षांमध्ये स्टार्टअपसाठी मिळणाऱ्या फंडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. असे असले तरी देशातील मोठमोठ्या सेलिब्रेटींनी यात पैसे गुंतविणे सुरूच ठेवले आहे.
बॉलिवूड स्टार्ससोबत स्पोर्ट्समधील मोठी नावेही यात आघाडीवर आहेत. २०२१ मध्ये सेलिब्रेटींना स्टार्टअपमध्ये ६०० मिलियन डॉलर्स म्हणजेच ५,००० कोटींहून अधिक पैसे गुंतविले होते.
२०२३ मध्येही सेलिब्रेटींना यात १०० कोटींहून अधिक रक्कम गुंतविली आहे. स्टार्टअपमध्ये पैसे गुंतविण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण सर्वात आघाडीवर आहे. तिने एकटीने ११ स्टार्टअपमध्ये पैसे गुंतविले आहेत.
अभिनेता आणि निवेदक गौरव कपूरने स्टार्टअपसाठी लागणाऱ्या सर्वाधिक फंडिंग राऊंडमध्ये सहभाग घेतला आहे.
बॉलिवूड अभिनेत्यांची गुंतवणूक, २०२३ मध्ये अनेक स्टार्टअपमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.