Tap to Read ➤

स्टायलिश, स्मार्ट अन् बुलेटपेक्षा जास्त पॉवरफुल; BMW ची स्कूटर लॉन्च..

BMW ने आपली दमदार C 400 GT स्कूटर लॉन्च केली आहे.
BMW ने आपली नवीन मॅक्सी स्कूटर C 400 GT भारतात विक्रीसाठी लॉन्च केली आहे. स्टायलिश लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या स्कूटरची सुरुवातीची किंमत 11,50,000 रुपये आहे. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत या स्कूटरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
2025 मॉडेलला नवीन पेंट स्कीम आणि अधिक वैशिष्ट्ये मिळतात. मात्र याच्या इंजिनमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. बीएमडब्ल्यूने स्कूटरला नवीन विंडस्क्रीन दिली आहे, जी रायडरला वाऱ्यापासून वाचवण्यासाठी उत्तम आहे. याशिवाय, सीटची उंची 10 मिमीने 775 मिमी वरून 765 मिमी केली आहे.
कंपनीने स्कूटरचे एक नवीन व्हर्जन सादर केले आहे, ज्यामध्ये गोल्डन अलॉय व्हील, ब्रेक कॅलिपर आणि ग्राफिक्स, सीटवर एम्ब्रॉयडरी आणि टिंटेड विंडस्क्रीन मिळते.
याशिवाय, BMW लोगो प्रोजेक्शन आणि स्टेनलेस-स्टील फ्लोअरबोर्ड इन्सर्टसह फ्लोर लाइटिंग देखील मिळते. हे सर्व घटक मानक ट्रिममध्ये पर्यायी म्हणून दिले जात आहेत, ज्यासाठी ग्राहकांना स्वतंत्रपणे पैसे मोजावे लागतील.
कंपनीने या स्कूटरमध्ये 350 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे. जे 33.5 bhp ची पॉवर आणि 35 न्यूटन मीटर (Nm) टॉर्क जनरेट करते. पॉवरच्या बाबतीत, हे रॉयल एनफील्ड बुलेट आणि क्लासिकपेक्षा जास्त पॉवर आउटपुट देते.
कंपनीने या स्कूटरमध्ये 12.8 लीटरची इंधन टाकी दिली असून, स्कूटरचे एकूण वजन 214 किलो आहे. C 400 GT स्कूटरच्या पुढील बाजूस 15-इंच अलॉय व्हील आणि मागील बाजूस 14-इंच अलॉय व्हील आहे.
याशिवाय समोर टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि मागील बाजूस प्रीलोड-ॲडजस्टेबल ड्युअल-स्प्रिंग सस्पेन्शन मिळतात. कंपनीचा दावा आहे की, या सस्पेन्शनमुळे स्कूटरची लांब राइड ड्रायव्हरसाठी खूप आरामदायी बनते.
या स्कूटरमध्ये लीन-सेन्सिटिव्ह एबीएस प्रो, डायनॅमिक ब्रेक कंट्रोल (डीबीसी), डायनॅमिक ट्रॅक्शन कंट्रोल (डीटीसी) आणि इंजिन ड्रॅग टॉर्क कंट्रोल (एमएसआर) सारखी प्रगत वैशिष्ट्ये मिळतात.
याशिवाय यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 10.25 इंच TFT स्क्रीन आणि USB-C चार्जिंग पोर्ट देखील आहे. पुढील स्टोरेज कंपार्टमेंट आणि बूट स्पेसचा आकार देखील वाढविण्यात आला आहे. विशेष गोष्ट म्हणजे आता यात 37.6 लीटरची एक मोठी अंडरसीट स्टोरेज स्पेस देखील मिळते.
क्लिक करा