सोनं किती शुद्ध आहे, हे आता सरकार तपासणार; पाहा कसं?
तुमचं सोनं किती शुद्ध आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला अॅप मदत करू शकतं.
धनत्रयोदशीला तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर, तुमचं सोनं किती शुद्ध आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला अॅप मदत करू शकतं.
खरेदीदारांना मदत म्हणून बीआयएसनं एक अॅप लाँच केलंय. देशातील सर्व प्रकारची सोनं आणि चांदीची ज्वेलरी ट्रॅक करण्यासाठी हे अॅप मदत करेल.
बीआयएस केअर अॅप हे केवळ हॉलमार्कवाल्या ज्वेलरीसाठी आहे. यामध्ये तुम्हाला रिअल टाईम माहिती मिळेल.
HUID चा अर्थ हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे. कन्झ्युमर अफेअर्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटनुसार ई-एचयुआयडी नंबर एक युनिक अल्फान्युमरिक कोड आहे. यात सहा अक्षरं असतात.
हॉलमार्किंगदरम्यान प्रत्येक तुकड्याला एक HUID नंबर दिला जातो. हा युनिक नंबर असेसिंग आणि हॉलमार्किंग सेंटरमध्ये दागिन्यांवर फिजिकली इंप्रिंट केला जातो.
तुमच्या अॅप स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुमचा नाव, फोन नंबर आणि इमेल टाका. नंतर ओटीपीच्या मदतीनं ते व्हेरिफाय करा.
बीआयएसनं दिलेल्या माहितीनुसार तुम्ही व्हेरिफाय एचयुआयडी सुविधेचा वापर करून हॉलमार्क असलेले दागिने किती शुद्ध आहेत ते पाहू शकता.