Tap to Read ➤
अमृता-प्रसादच्या लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीचं फोटोशूट चर्चेत
बिग बॉस मराठीच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे.
काही दिवसांपूर्वीच या जोडीने त्यांच्या लग्नगाठ बांधली. त्यामुळे सध्या ते चर्चेत येत आहे.
लग्नानंतर त्यांचा पहिला सण मकरसंक्रांत त्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.
अमृता देशमुखने इंस्टाग्रामवर त्यांच्या संक्रांत सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत अमृताने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. यावर तिने हलव्याचे दागिने घातले आहेत.
तर प्रसादनेही काळ्या रंगाचा सदरा आणि पायजमा घातला आहे. याशिवाय त्याने हलव्याचे दागिने घातले आहेत.
अमृता आणि प्रसाद दोघेही या गेटअपमध्ये छान दिसत आहेत.
क्लिक करा