Tap to Read ➤
बॉस लेडी! bigg boss फेम स्नेहा वाघचा बोल्ड लूक चर्चेत
स्नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून सध्या तिने केलेलं फोटोशूट चर्चेत आलं आहे.
बिग बॉस मराठी ३ या शोच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ.
बिग बॉसच्या घरात तिच्या टास्क खेळण्यापेक्षा पर्सनल लाइफमुळे ती सर्वात जास्त चर्चिली गेली.
कलाविश्वाप्रमाणेच स्नेहा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय आहे.
अलिकडेच स्नेहाने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. यातील काही फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
स्नेहाने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हे खास फोटोशूट केलं आहे.
बॉस लेडी म्हणत स्नेहाने हे फोटो शेअर केले आहेत.
सध्या सोशल मीडियावर स्नेहाच्या या नव्या फोटोंची चांगलीच चर्चा रंगतांना दिसत आहे.
स्नेहाने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करुन एक स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे.
अधूरी एक कहाणी या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
क्लिक करा