Tap to Read ➤

२२ नंबरचा शूज अन् ६४ इंचाची छाती...BIG SHOW आता आहे कुठे?

WWE स्टार BIG SHOW ची पडद्यामागची कहाणी...
WWE चे भारतातही कोट्यवधी चाहते आहेत. ९० च्या दशकातील मुलं या फाइट्स पाहातच मोठे झाले आहेत आणि याची प्रचंड क्रेझ असायची.
WWE च्या जुन्या स्टार्सची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. यातील एक नाव म्हणजे The Big Show. भलं मोठी दणकट शरीरयष्टीमुळे बिग शो भल्याभल्यांना आडवा करायचा.
तुमचा लाडका Big Show सध्या काय करतो याची उत्सुकता तुम्हाला असेल तर याची माहिती आता कळाली आहे.
Big Show चं खरं नाव पॉल वाइट असं आहे. सध्या त्याचं वय ५१ वर्ष इतकं आहे. तो मूळचा अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिवना इथला आहे.
खरंतर 'बिग शो' याला लहानपणापासूनच एक आजार आहे. त्यामुळेच कमी वयात त्याचं वजन आणि उंची वाढू लागली होती.
१९९४ साली पॉल वाइट कुणाच्यातरी संपर्कात आला आणि त्याला रेसलिंगमध्ये येण्याची ऑफर मिळाली. त्यानं सर्वात आधी WWA मध्ये प्रवेश केला होता.
पॉल वाइटनं १९९५ ते १९९९ पर्यंत वर्ल्ड चॅम्पियनशीप रेसलिंग, १९९९ ते २०२१ पर्यंत वर्ल्ड रेसलिंग फेडरेशनमध्ये फाइट्स केल्या आहेत. आधी त्याला 'द जाएंट' म्हणून ओळखलं जायचं.
'बिग शो'नं १९९० मध्ये एक सर्जरी केली आणि त्याचा आजार दूर झाला. रेसलिंगमध्ये येण्याआधीपर्यंत त्याच्या शूजची साइज 22 5E इतकी होती.
'बिग शो'ची शरीरयष्टी किती दणकट होती याचा अंदाज त्याची छाती तब्बल ६४ इंचाची होती यावरुन लक्षात येतं. त्यानं स्वत:साठी एक बस खरेदी केली होती कारण तो इतर कोणत्याही वाहनात सहजतेनं प्रवास करू शकत नव्हता.
२०२१ मध्ये 'बिग शो'नं WWE सोडलं. त्यानंतर तो कॉमेंट्री करताना पाहायला मिळाला.
क्लिक करा