Tap to Read ➤
Diwali 2023 : केसांत माळला गजरा अन् भूमीवर खिळल्या नजरा!
भूमी पेडणेकरने यंदा दिवाळीसाठी खास लूक केला होता.
भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
भूमीदेखील दरवर्षी इतर सेलिब्रिटींप्रमाणे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करते.
यंदाही तिने दिवाळीसाठी खास लूक केला होता. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
भूमीने सोनेरी रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केला होता.
त्यावर तिने स्लीव्हलेस ब्लाऊज घालत फॅशन केली होती.
मोठे कानातले आणि गळ्यात खड्यांच्या ज्वेलरीमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं होतं.
भूमीने पारंपरिक लूक करत केसांत गजराही माळला होता.
तिच्या या लूकवर चाहत्यांच्याही नजरा खिळल्या आहेत.
क्लिक करा