Tap to Read ➤

'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीची लेक अवंतिका आईसारखीच दिसते सुंदर

अभिनेत्री भाग्यश्रीची लेक अवंतिका दसानी कलाविश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रीय आहे.
अवंतिका अनेकदा सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
भाग्यश्रीची लेक अवंतिका २५ वर्षांची असून ती प्रचंड सुंदर दिसते.
त्यामुळे कलाविश्वात येण्यापूर्वीच तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
अवंतिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं अशी अनेक चाहत्यांची इच्छा आहे. मात्र, सिने इंडस्ट्रीमध्ये येण्याविषयी तिचा सध्या कोणताही विचार नसल्याचं सांगण्यात येतं.
अवंतिकाला ट्रॅव्हलिंग, डान्सिंग, फॅशन, पार्टी करणे या सगळ्या गोष्टींची आवड असल्याचं सांगण्यात येतं.
अवंतिकाने लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे. बिझनेस आणि मार्केटिंगमध्ये तिने डिग्री घेतल्याचं सांगण्यात येतं.
क्लिक करा