दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईतील बेस्ट मार्केट, स्वस्त दरात करा शॉपिंग

यंदाची दिवाळी होईल खास, मुंबईतील या बाजारात मिळतात आकर्षक वस्तू

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता बाजारपेठाही चांगल्याच सजल्या आहेत.

आज आपण मुंबईतील अशा काही बाजारपेठा पाहुयात. जेथे स्वस्तात खरेदी करता येऊ शकते.

जर तुम्हाला यंदाच्या दिवाळीत ट्रेंडी दिव्यांनी घर उजळवायचं असेल तर माटुंगा गाठा. माटुंगा मार्केट हे दिवे खरेदीसाठी बेस्ट ऑप्शन आहे. १०० रुपयांपासून इथे दिवे मिळतात.

जर तुम्हाला वेगवेगळी तोरणं किंवा लायटिंग हव्या असतील तर मुंबईतील लोहार चाळीला भेट द्या. हे होलसेल मार्केट असल्यामुळे परवडणाऱ्या दरात विविध वस्तू सहज मिळतात.

लग्नकार्य असो वा सणवार मुंबईकर आवर्जुन भेट देतात ते ठिकाण म्हणजे भुलेश्वर मार्केट. या मार्केटमध्ये कपड्यांपासून ते सजावटीच्या सामानापर्यंत प्रत्येक गोष्ट सहज मिळते.

कपड्यासाठी हिंदमाता मार्केट बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला या दिवाळीत पारंपरिक कपडे घालायचे असतील, तर हिंदमाताला नक्की भेट द्या.

टाचदुखीने त्रस्त आहात? ही काळजी घ्या म्हणजे मिळेल आराम

Click Here