शरीरातील हार्मोन्स बॅलेन्स करण्यासाठी खा 'हे' पदार्थ

हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी आहारात काही किरकोळ बदल करणं गरजेचं आहे.

हार्मोन्स (Hormones) हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या हार्मोन्समुळे मानसिक आरोग्य, झोप, भूक, वजन, ताणतणाव अशा अनेक गोष्टींवर थेट परिणाम होत असतो.

हार्मोन्स संतुलित (Balanced) ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात आणि आहारात काही किरकोळ बदल करणं गरजेचं आहे.

शरीरातील हार्मोन्स बॅलेन्स करायचा असेल तर आहारात प्रथिने,हेल्दी फॅट्स, कार्बोहायड्रेट्स असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

दररोजच्या आहारात मूग, उडीद, अंडी, दूध, दही, डाळ, सुकामेवा यांचा समावेश करावा.

नारळ तेल, तूप, ऑलिव्ह ऑइल, बदाम, अक्रोड, जवस बी हे पदार्थसुद्धा आवर्जुन खावेत.

भाज्या, फळे, संपूर्ण धान्य (whole grains), रताळे यांचं सेवन करा. यामुळे कार्बोहायड्रेट्स मिळतात.

जास्त साखर, पॅकेज्ड फूड, सॉफ्ट ड्रिंक या पदार्थांचं सेवन टाळा.

आरोग्याच्या 'या' तक्रारी असतील तर मटार खाणे पडेल महागात...

Click Here