रोज भिजवलेल्या मेथीचे दाण खाल्ल्याने आरोग्याला कसा फायदा होतो जाणून घेऊया.
मेथीच्या बियांमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, जीवनसत्त्वे आणि खनिजे असे इतर गुणधर्म आहेत. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
रोज भिजवलेल्या मेथीचे दाण खाल्ल्याने आरोग्याला कसा फायदा होतो जाणून घेऊया.
मेथीचे दाणे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहेत. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे रामबाण औषधांपेक्षा कमी नाही.
मेथीमध्ये फायबर असते, जे पचनासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस, आम्लता या समस्यांपासून आराम मिळतो.
मेथीचे दाणे पाण्यात भिजवून दररोज खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहाते.
यात असणारे पोषक घटक त्वचेला आणि केसांना फायदेशीर ठरतात. यामुळे त्वचा तरुण राहाते. केस काळे आणि दाट होतात.
भिजवलेले मेथीचे दाणे खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होतो, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
मेथी दाण्यात असणारे घटक प्रजनन क्षमता वाढवते. तसेच यासंबंधित असणाऱ्या समस्यांपासून आराम मिळतो.
मासिक पाळी, रजोनिवृत्ती, गर्भधारणा, स्तनपान इत्यादींमध्ये मेथी दाणे खाणे फायदेशीर आहे.