शारीरिक तक्रारी दूर करायच्या असतील तर खा खजूर!

 रोज फक्त 2 खजूर खा अन् तब्येतीच्या तक्रारी ठेवा दूर

आयुर्वेदामध्ये खजुराला प्रचंड महत्त्व आहे. अनेक आजारांमध्ये खजुराचा औषध म्हणून वापर केला जातो.

अशक्तपणा आल्यास खजूर खावा. खजूर खाल्ल्यामुळे तात्काळ ऊर्जा मिळते.

खजुरामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. आणि, बद्धकोष्ठतेची तक्रार दूर होते.

खजुरातील ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे गंभीर आजारांपासून संरक्षण होतं. खजुरात असलेल्या फ्लेवोनॉइडस या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे मधुमेह, अल्झायमर आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. 

खजुरामुळे हृदय आणि डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं. तसंच मेंदुचा विकासही चांगला होतो.

खजूर खाल्ल्याने रक्तातील साखर लगेच वाढत नाही. साखर नियंत्रित ठेवण्यास फायदा होतो.

मराठमोळी थोडीशी साधीभोळी...

Click Here