कापूरामध्ये घरातील नकारात्मकता दूर करण्याची क्षमता असते
पुजेच्या साहित्यात महत्त्वाचा असलेला घटक म्हणजे कापूर.
कापूरामध्ये घरातील नकारात्मकता दूर करण्याची क्षमता असते. तसेच त्याचे काही गुणकारी फायदेही आहेत.
कापूराच्या वासामुळे मानसिक ताण कमी होतो.
डोकं दुखत असेल तर कापूर, शुंथी, अर्जुन वृक्षाची साल आणि पांढर चंदन समप्रमाणात घेऊन तो लेप कपाळाला लावा.
स्नायूंमध्ये वेदना होत असतील तर मोहरीच्या तेलात कापूर मिक्स करा. आणि, या तेलाने दुखऱ्या भागाची मालिश करा.
खोकला झाल्यास कापूरयुक्त तेलाने छाती आणि पाठीला मालिश करा.
सर्दी झाल्यास गरम पाण्यात कापूर टाकून वाफ घ्या. नाक मोकळं होतं.