केसांची वाढ करण्यासाठी तेजपत्ता अधिक फायदेशीर ठरतो.
जेवणाची चव वाढवण्यासाठी तमालपत्राचा वापर केला जातो. ज्यामुळे केवळ पदार्थाची चवच नाही तर त्याचा सुगंधही वाढतो. जे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
सध्या केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. यासाठी बाजारात अनेक प्रकारचे उत्पादने देखील उपलब्ध आहेत.
केसांची वाढ करण्यासाठी तेजपत्ता अधिक फायदेशीर ठरतो. केसांना तेजपत्ताचे तेल केस लावायचे जाणून घेऊया.
तेजपत्त्यांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत. जे टाळू स्वच्छ करण्यास आणि केसातील कोंडा रोखण्यास मदत करतात. तसेच यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सि़ंट्सचे गुणधर्म आहेत.
तेलच नाही तर तेजपत्त्यांचे पाणी देखील आपण केसांना लावू शकतो. यामुळे केसांचे खोलवर पोषण होते.
जर आपल्या केसात संसर्ग किंवा बुरशीजन्य समस्या असतील तर तेजपत्ता वापरल्याने खूप फायदे मिळतील. याच्या नियमित वापरामुळे बॅक्टेरियाची वाढ देखील कमी होते.
आपल्या केसात कोंडा होत असेल तर आठवड्यातून ३ वेळा तेजपत्त्याचे तेल लावायला हवे. यात असणारे घटक केसांची खुंटलेली वाढ, केसगळती आणि कोंडा रोखण्यास मदत करते.