योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे सरकारने बंधनकारक केले आहे. यासाठी ladakibahin. maharashtra. gov.in पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल. नियमित लाभ मिळण्यासाठी महिलांनी तत्काळ ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
या योजनेचा सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांनी लाभ घेतल्याचे उघड झाले होते. त्यामुळे आता ई-केवायसी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या पोर्टलवर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे केवायसी करणार नाहीत ते अपात्र होतील.
केवायसी करण्यासाठी आधार कार्ड व त्यासोबत जोडलेला मोबाइल सोबत ठेवणे आवश्यक आहे. चालू आर्थिक वर्षात दोन महिन्यात लाभार्थी महिलांना हे पूर्ण करणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी. लॉगइन करून ई-केवायसीसाठी क्लिक करा.
ई-केवायसी पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाका. नंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या. यानंतर मोबाइलवर ओटीपी मिळेल.