Tap to Read ➤
बाळाचे नाव ठेवताय? वाचा भगवद्गीतेतली अर्थपूर्ण नावं!
भगवद्गीता हा आत्मभान देणारा धर्मग्रंथ आहे, तर त्या अंतर्गत येणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नावं जीवनाला सुंदर वळण देणारी आहेत.
कृष्ण : भगवद्गीतेचा निर्माता कृष्ण या नावाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा गुण आहे लोकांना आकर्षून घेणे.
अर्जुन : भगवद्गीता निर्मितीचे कारण ठरलेला धनुर्धारी आणि कृष्ण सखा अर्जुन हे नाव तेजोवलयाचे प्रतीक आहे.
भव्य : नावातच भव्यता आहे, हे नाव संबंधित व्यक्तीला तिच्या कार्यक्षेत्रात भव्य कामगिरी करण्याची प्रेरणा देईल.
गीता : गीता अर्थात कवितेचे झालेले गाणे. भगवंताने सांगितलेले तत्वज्ञान गेय रूपात प्रगटले, त्यामुळे या नावाचे महत्त्व वाढले.
संजय : दिव्यदृष्टी प्राप्त झालेली महाभारतातील व्यक्ती. हे नाव विजयाचे प्रतीक मानले जाते.
नंदिनी : प्रेमवर्षाव करणारी, आनंद देणारी स्त्री; सध्याच्या वैफल्य ग्रस्त जगात हे नाव स्वतःला आणि इतरांना प्रेम देणारे ठरेल.
पार्थ : पृथेचा अर्थात कुंतीचा मुलगा तो पार्थ, हे अर्जुनाचेच आणखी एक नाव आहे तर पृथा म्हणजे भूमी, म्हणजे पार्थ हे नाव भूमिपुत्राचे म्हणता येईल.
राधा : कृष्ण भक्तीचे नितांत सुंदर रूप! प्रेमळ आणि वात्सल्य मूर्ती म्हणजे राधा
भाग्या : भाग्य अर्थातच भविष्य, स्वतःच्या कर्तृत्त्वाने स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवणारी व्यक्ती म्हणून भाग्या हे नाव प्रेरणादायी ठरेल.
क्लिक करा