Tap to Read ➤
ना ऑस्ट्रेलिया ना BCCI, वर्ल्ड कपमध्ये यांनी कमावले २३,८४,३०,०४,९०,०००
रविवारी तब्बल ५.९ कोटी लोकांनी अंतिम सामना ऑनलाइन पाहिला.
रविवारी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झालेला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना ५.९ कोटी लोकांनी पाहिला. हा एक रेकॉर्ड आहे.
यानंतर डिझ्नी हॉटस्टारच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. कामकाजादरम्यान यात १.३२ टक्क्यांची वाढ झाली.
डिझ्नी हॉटस्टारच्या शेअर्समध्ये वर्ल्ड कप दरम्यान वाढ झाली. ४ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान यात २० टक्क्यांची तेजी आली.
४ ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज बंद झालं तेव्हा त्यांच्या शेअरची किंमत ७९.३२ डॉलर्स प्रति शेअर होती.
२० नोव्हेंबर रोजी यात २६ डॉलर्सची वाढ झाली आणि ती ९५.४० डॉलर्स प्रति शेअरवर आली.
कंपनीच्या मार्केट कॅपबद्दल सांगायचं झालं तर त्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या कंपनीचं मार्केट कॅप १६९.६७ बिलियन डॉलर्स आहे.
४ ऑक्टोबर रोजी कंपनीचं मार्केट कॅप १४१.०७ अब्ज डॉलर्स होतं. आतापर्यंत यात २८.६० अब्ज डॉलर्सची वाढ झाली.
भारतीय रुपयांमध्ये समजून घ्यायचं झालं तर ४ ऑक्टोबर नंतर यात २.३८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
क्लिक करा