'या' ५ बँका RD वर देतायत ८ टक्क्यांपर्यंत व्याज, इथे चेक करा व्याजदर
जोखीम घ्यायची नसेल तर ही गुंतवणूक सर्वात चांगली मानली जाते.
तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर कोणतीही जोखीम घ्यायची नसेल, तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट (FD) तसंच रिकरिंग डिपॉझिटमध्ये (RD) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.
जर तुम्हाला एकरकमी रक्कम गुंतवायची असेल तर तुम्ही एफडीमध्ये पैसे गुंतवू शकता. दर महिन्याला गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही आरडीमध्ये गुंतवणूक करू शकता.
देशातील अनेक बँका तुम्हाला आरडीवर ८ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. पाहूया कोणत्या आहेत या बँका.
बंधन बँक - बंधन बँक सामान्य ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीच्या RD साठी ६.५० टक्के ते ७.५० टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या कालावधीच्या आरडीसाठी ७ टक्के ते ८ टक्के व्याज दिले जाईल.
इंडियन ओव्हरसीज बँक - इंडियन ओव्हरसीज बँक सामान्य ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीच्या आरडीवर ५.७५ टक्के ते ७.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.२५ टक्के ते ७.७५ टक्के व्याज देत आहे.
डॉइश बँक - डॉइश बँक आपल्या सामान्य ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीच्या आरडीवर ६ टक्के ते ७.५० टक्के व्याज देत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना आरडीवर ६.५० टक्के ते ७.७५ टक्के व्याज देत आहे.
सिटी युनियन बँक - सिटी युनियन बँक आपल्या सामान्य ग्राहकांना आरडीवर ६.७० टक्के ते ७.१० टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना आरडीवर ६.९५ टक्के ते ७.५० टक्के व्याज देत आहेत.
डीएचएफएल बँक - डीएचएफएल बँक सामान्य ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीच्या आरडीसाठी ७.७५ टक्के व्याज देत आहे. डीएचएफएल बँक विविध कालावधीच्या आरडीसाठी ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याज देत आहे.