Tap to Read ➤

पटापट कामं आटपून घ्या; २४, २५ मार्च रोजी बँक कर्मचारी संपावर

कर्मचारी संघटनांची घोषणा, पाहा काय आहेत कारणं...
बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत इंडियन बँक्स असोसिएशनबरोबरच्या चर्चेमधून काहीही तोडगा दृष्टिपथात नसल्याने बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी येत्या २४ व २५ रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.
बँकांमधील कर्मचारी भरतीच्या मागणीला बळ यावं, यासाठी हा संप असल्याचं संघटनेतर्फे सांगण्यात आलं.
बँकांमध्ये सर्वच संवर्गांमधील नोकरभरती तातडीनं करावी, त्याचबरोबर पाच दिवसांचा सप्ताह सुरू करण्याच्या मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचा संयुक्त फोरम आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांच्यामध्ये चर्चा सुरू होती.
मात्र या चर्चेतून ठोस असा कोणताही निष्कर्ष निघत नसल्याने संघटनांनी मागण्या पुढे रेटण्यासाठी संपाचा निर्णय जाहीर केला .
केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा विभागातर्फे बँक कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यांना कामगिरीनुसार काही इन्सेंटिव्ह देण्याची घोषणा केली आहे. याला कर्मचारी संघटनांचा विरोध आहे. हे थांबवण्याची मागणी करण्यात आलीये.
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची जुनी मागणी अद्यापही प्रलंबित आहे. ही मागणी मान्य करून ग्रॅच्युइटीची रक्कम आयकरामधून मुक्त करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँकस युनियनमध्ये नऊ कर्मचारी संघटना सहभागी आहेत. त्यामध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लाइज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन या प्रमुख संघटना आहेत.
क्लिक करा