आता डिजिटल रुपयानं करा UPI पेमेंट, सरकारी बँकेनं सुरू केली सुविधा
काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं डिजिटल करन्सी लाँच केली होती.
काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं डिजिटल करन्सी लाँच केली होती. आता सरकारी बँकेनं डिजिटल रुपीची सुरुवात केली आहे.
बँक ऑफ बडोदानं डिजिटल रुपी अॅपवर युपीआय आणि क्युआर इंटरऑपरेबिलिटी सुरू केलं आहे.
या नव्या सेवेअंतर्गत ग्राहकांना डिजिटल रुपयांच्या माध्यमातून युपीआय पेमेंट करता येणार आहे. सध्या ही सुविधा ठराविक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
या नव्या सेवेद्वारे ग्राहक आणि दुकानदारांदरम्यान कोणत्याही समस्येशिवाय पैसे पाठवता अथवा घेता येणार आहेत.
ग्राहक कोणत्याही मर्चंट आऊटलेटवर युपीआय क्युआर स्कॅन करून बँक ऑफ बडोदा डिजिटल रुपी अॅपमधून पेमेंट करू शकतात.
सध्या या सेवेचा लाभ दिल्ली, मुंबई, भुवनेश्वर, चंडीगड, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद, गुवाहाटी, गंगटोक, इंदूर, भोपाळ, पुणे, लखनौ, पाटणा, कोच्ची, शिमला, गोवा, जयपुर, कोलकाता, चेन्नई, रांची, नागपुर या शहरांत घेता येईल.
डिजिटल रुपया रिझर्व्ह बँकेद्वारे डिजिटल फॉर्ममध्ये जारी करण्यात आलेला लीगल टेंडर आहे.