बेकिंग सोड्याचे असंख्य फायदे आहेत.
आपल्या स्वयंपाक घरात अशा कितीतरी गोष्ट असतात ज्यांचा संबंध केवळ खाण्यापूरता नसून आरोग्याशीही निगडीत असतो.
प्रत्येक घरात बेकिंग सोडा हा असतोच असतो. त्यामुळे आज त्याचे काही फायदे काय ते पाहुयात.
पोटात जळजळ होत असेल किंवा गॅस झाला असेल तर चिमूटभर बेकिंग सोडा ग्लासभर पाण्यात टाकून प्या. त्यामुळे नक्कीच आराम मिळेल.
जर दातांवर पिवळा थर जमा झाला असेल तर बेकिंग सोड्याने दात घासा. काही वेळ हा सोडा तसाच दातांवर ठेवा आणि मग गुळणी करा.
त्वचेवरील डेड सेल्स काढण्यासाठी बेकिंग सोड्याची पेस्ट करुन ती चेहऱ्यावर लावू शकता.
फ्रीजमध्ये किंवा शूजमध्ये घाण वास येत असेल तर त्या ठिकाणी बेकिंग सोडा ठेवा.