Bajaj च्या CNG बाईकची हवा! 50,000 युनिट्सची विक्री; महाराष्ट्रात टॉपवर
Bajaj Freedom 125 CNG: Bajaj ने गेल्या वर्षी जगातील पहिली CNG बाईक लॉन्च केली होती.
Bajaj Freedom 125 CNG: देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Bajaj ऑटोने गेल्यावर्षी जगातील पहिली CNG बाईक Freedom 125 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली होती.
आकर्षक लुक आणि स्पोर्टी डिझाईनने सुसज्ज असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत 95,000 रुपये (एक्स-शोरूम) असून, ग्राहकांचा पसंतीस उतरली आहे.
ऑटोकारच्या रिपोर्टनुसार, लॉन्च झाल्यापासून या CNG बाईकच्या 50 हजाराहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.
बजाजच्या सीएनजी बाईकला हा आकडा पार करण्यासाठी 8 महिने लागले. हा डेटा 18 मार्च 2025 पर्यंतचा आहे.
या बाईकची मागणी महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. या कालावधीत महाराष्ट्रात एकूण 9,591 युनिट्सची विक्री झाली.
गुजरात 8,747 युनिट विक्रीसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर 5,428 युनिट्ससह उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे.
गेल्या 8 महिन्यांच्या विक्रीवर नजर टाकल्यास जुलै-24 मध्ये त्याची विक्री मंदावली होती. तसेच, या महिन्यातही या सीएनजी बाईकच्या केवळ 272 युनिट्सची विक्री झाली आहे.
गेल्या वर्षी सणासुदीच्या निमित्ताने फ्रीडम 125 ने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अनुक्रमे 11,076 युनिट्स आणि 12,159 युनिट्सची विक्री नोंदवली आहे.
कंपनीने सुरुवातीला ही बाईक फक्त महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये लॉन्च केली होती. याचे कारण म्हणजे, येथील सीएनजी फिलिंग स्टेशनची पायाभूत सुविधा जास्त चांगली आहे.
यानंतर हळुहळू ही बाईक इतर राज्यांमध्ये विक्रीसाठी लॉन्च करण्यात आली. सध्या या बाईकला सीएनजी पंप उपलब्ध असलेल्या भागात मागणी आहे.
कंपनीने Bajaj Freedom मध्ये 125 सीसी क्षमतेचे पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 9.5PS पॉवर आणि 9.7Nm टॉर्क जनरेट करते.
यात कंपनीने 2 लिटरचा पेट्रोल फ्यूल टँक आणि 2 kg चा CNG टँक दिला आहे. ही बाईक फुल टँक (पेट्रोल+सीएनजी) मध्ये 330 किमीची रेंज देते.
ही बाईक पेट्रोल आणि CNG दोन्ही मोडमध्ये चालवता येते. यासाठी कंपनीने हँडलबारवर एक स्विच दिला आहे.