Tap to Read ➤

बाबा लगीन..! पछाडलेला चित्रपटातला बाब्या आठवतोय का?

माहितीये तो सध्या काय करतोय?
महेश कोठारे दिग्दर्शित पछाडलेला हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्ब्ल ७ कोटींहून अधिक गल्ला जमवला होता.
इनामदारांच्या वाड्यातला बाब्या ‘बाबा लगीन’ म्हणत मनीषा सोबत लग्न करायला धडपडत असतो.
बाब्याचा हा रोल तुफान गाजला होता. त्यानंतर त्यावर अनेक मीम्सही आले होते. इतकंच काय तर गाणंही तयार झालं होतं.
या बाब्याची भूमिका साकारणारा कलाकार म्हणजे अमेय हुनसवाडकर.
अमेय हा मराठी, हिंदी चित्रपट तसेच मालिका अभिनेता आहे. लहान मोठ्या भूमिका साकारत असतानाच बाब्याच्या भूमिकेने त्याच्या करिअरला मोठे वळण मिळाले.
विनोदाचे टायमिंग आणि अभिनयाची सांगड घालत तो हिंदी चित्रपटात देखील चमकू लागला.
नायक, तुझे मेरी कसम, प्‍लॅन, रॉकी अँड अकसर, बॉम्‍बे टू बँकॉक, व्हिक्‍टोरिया नं २०३, अजब प्रेम की गजब कहानी अशा बॉलिवूड चित्रपटातून त्याच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळत गेला.
सध्या तो जाहिरात क्षेत्रातही दिसून येत असून नुकतीच त्यानं रवी शास्त्री यांच्यासोबतही जाहिरात केली.
याशिवाय छत्रीवाली या चित्रपटातही तो अभिनेत्री रकुल प्रीत सिंहसह स्क्रिन शेअर करताना दिसला आहे.
नुकताच त्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याच्या कामाचंही कौतुक केलं जात आहे.
क्लिक करा