Tap to Read ➤

बाहुबलीतील 'कटप्पा' आता नेमकं करतोय काय, कसं जगतोय आयुष्य?

अभिनयात करिअर करण्यासाठी घर सोडलं, आईच्या विरोधात गेला अन्...
बाहुबली या ब्लॉकबस्टर चित्रपटाने सर्वांनाच वेड लावलं. पण यात कटप्पा या भूमिकेने सर्वांच लक्ष वेधून घेतलं.
कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज यांचा आज 69 वा वाढदिवस आहे.
सत्यराज यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1954 रोजी झाला. त्यांचं खरं नाव रंगाराज सुबय्या असं आहे.
सत्यराज यांनी करिअरमध्ये दमदार भूमिका साकारल्या. मात्र बाहुबलीमुळे खूप लोकप्रियता मिळाली.
200 हून अधिक चित्रपटांत काम केलं. आज यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जात असले तरी त्यांनी संघर्ष केला आहे.
अभिनयात करिअर करण्यासाठी घर सोडलं. आईच्या विरोधात जाऊन फिल्म इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली.
1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या एनाक्कुल ओरुवन या चित्रपटातील त्यांच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं.
सत्यराज यांनी त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. चेन्नई एक्सप्रेसमध्येही भूमिका साकारली होती.
काही दिवसांपूर्वी सत्यराज यांच्या 'सुपर ह्यूमन वेपन'चा टीझर समोर आला आहे.
'सुपर ह्यूमन वेपन' चित्रपटामधील अभिनेत्याचा लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.
सत्यराज सातत्याने काम करत असून सध्या ते नवनवीन भूमिका साकारत आहेत.
क्लिक करा