Tap to Read ➤

देवघराशी संबंधित 'या' चुका पडतील महाग!

देवघर : घरातले असे स्थान जिथे आपण पूर्ण पावित्र्य पाळतो, कारण ते देवाचे स्थान मानतो; त्यासंबंधित दिलेल्या चुका टाळायलाच हव्या!
वास्तु शास्त्रातही या चुका टाळण्यावर भर दिला आहे, एवढेच नाही तर देवघराशी संबंधित चुकांमुळे मोठे नुकसान होऊ शकते असेही म्हटले आहे.
वास्तु शास्त्रानुसार सर्वप्रथम देवघराची दिशा योग्य हवी; कारण देवघराचा आणि ऊर्जेचा परस्पर संबंध आहे.
देवघर चुकीच्या जागी असेल तर घरात शांतता टिकणार नाही आणि आर्थिक नुकसान झेलावे लागेल.
वास्तु शास्त्रानुसार देवघर उत्तर पूर्व दिशेला हवे. पश्चिम वा दक्षिण दिशा देवघरासाठी अयोग्य मानली जाते.
देवघरात थोडीही भग्न मूर्ती असेल तर ती आधी बदलावी, देवाची भग्न मूर्ती घरात ठेवणे म्हणजे संकटाना आमंत्रण देणे.
भग्न आरसा, भग्न घड्याळ, भग्न वस्तूंचा आपण वापर करत नाही, तसा देवघरातही भग्न मूर्ती न ठेवता त्या वेळीच विसर्जित करणे योग्य ठरते.
देवघर चुकूनही बेडरूममध्ये किंवा टॉयलेट, बाथरूम समोर ठेवू नका, तिथे देवाचे वास्तव्य राहणार नाही.
देवघराच्या वर वस्तू न ठेवता कप्य्यात वस्तू ठेवाव्यात पण देवघरावर भार पडेल असे किंवा कुठलेही किरकोळ सामान ठेवू नये.
देवघराजवळ निर्माल्य ठेवू नये. दुर्गंधी पसरते, अस्वच्छता वाढते. धूप, दीप लावूनही सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही.
क्लिक करा