वास्तुशांतीच्या दिवशी देऊ नयेत 'या' गोष्टींच्या भेटवस्तू 

वास्तुशास्त्रानुसार,कोणत्या वस्तू इतरांना भेट म्हणून देऊ नयेत हे जाणून घेऊयात.

एखाद्याच्या घरी काही शुभकार्य असेल वा एखादा कार्यक्रम असेल तर प्रत्येक जण त्यांच्याकडे जातांना रिकाम्या हाताने जात नाही. काही ना काही भेटवस्तू नक्कीच घेऊन जातात.

आजकाल बाजारात भेटवस्तू देण्यासाठी अनेक ऑप्शन्स आहेत. परंतु, वास्तुशास्त्रानुसार,कोणत्या वस्तू इतरांना भेट म्हणून देऊ नयेत हे जाणून घेऊयात.

एखाद्याला भेट देतांना कधीही धारदार वस्तू अजिबात देऊ नये. यामुळे नात्यात वाद निर्माण होण्याची शक्यता असते.

काळा रंग शुभकार्यात वापरला जात नाही. त्यामुळे चुकूनही काळ्या रंगाची वस्तू भेटीच्या स्वरुपात देऊ नये. यातून निगेटिव्हिटी पसरवली जाते.

अनेकदा वास्तुशांती असली की लोक सर्रास घड्याळ भेट म्हणून देतात. पण, घड्याळ कधीच कोणाला देऊ नये. घड्याळ देणं म्हणजे चांगला काळ संपण्याचं प्रतिक मानलं जातं.

देवाचा फोटो किंवा मुर्ती देऊ नयेत. कारण, देव ही आदानप्रदान करण्याची गोष्ट नाही. यामुळे देवाचा अपमान होऊ शकतो.

पहिल्यांदाच टॅटू काढताय? लक्षात ठेवा 'या' गोष्टी

Click Here