Tap to Read ➤

सँवार लूँ, हाय, सँवार लूँ..!

टेलिव्हिजन ते रुपेरी पडदा असा प्रवास करणारी २२ वर्षीय अभिनेत्री अवनीत कौर सातत्याने चर्चेत येत असते.
२०१० साली ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’मध्ये स्पर्धक बनून आलेल्या अवनीतने आत्तापर्यंत ७ टीव्ही मालिकांत काम केले आहे. ६ सिनेमांत झळकली आहे.
आता अवनीत कौर सोशल मीडियावरही सौंदर्याची जादू पसरवत असते. लेटेस्ट फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
नुकतेच अवनीतने साडीत फोटोशूट केले आहे. यात तिने एकापेक्षा एक दमदार पोझ दिल्या आहेत.
वेस्टर्न आउटफिटप्रमाणेच ती साडीतही खूप ग्लॅमरस दिसते आहे. अवनीतच्या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
अवनीत कौरने आपल्या करिअरची सुरुवात 'डान्स इंडिया डान्स लियल मास्टर्स' सारख्या डान्स रिॲलिटी शोमधून केली, जिथे ती सेमीफायनलपर्यंत पोहोचली.
यानंतर तिने 'मेरी मां' हा टीव्ही शो केला, ज्यामध्ये तिने एक छोटीशी भूमिका केली होती. या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
अवनीतने 'सावित्री'मध्ये तरुण राजकुमारी दमयंतीची, 'एक मुठी आसमान'मध्ये तरुण पाखी आणि विशेषतः 'चंद्र नंदिनी'मध्ये राजकुमारी चारुमतीची भूमिका साकारली होती.
याशिवाय अवनीत कौरने 'मर्दानी २' आणि 'टिकू वेड्स शेरू' सारख्या बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे.
क्लिक करा