तुमच्यासाठी कायपण! ही अभिनेत्री शुबमन गिलसाठी मॅच बघायला येते?
कोण आहे ती अभिनेत्री? अन् का रंगतीये दोघांची जोडी जमल्याची चर्चा जाणून घ्या सविस्तर
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुबमन गिलचं नाव आता आणखी एका अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे.
भारतीय लोकप्रिय अभिनेत्रीनं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान दुबईच्या स्टेडियमवर हजेरी लावत मॅचचा आनंद घेतानाचे काही फोटो शेअर केले अन् ती शुबमन गिलसोबत डेटिंग करत असल्याची चर्चा रंगली.
भारतीय संघाच्या मॅचचा आनंद घेण्यासाठी दुबईच्या मैदानात दिसलेल्या त्या अभिनेत्रीचं नाव अवनीत कौर असं आहे.
या सुंदर अभिनेत्रीसोबत क्रिकेटर शुबमन गिलचं नाव जोडण्यामागचं कारण आहे तिच्या सोलो फोटोशिवाय व्हायरल होणारा एक ग्रुप फोटो
अवनीत कौरच्या एका मित्राने शुबमन गिलसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत शुबमन गिलसोबत अवनीत कौरचीही झलक पाहायला मिळते. या फोटोवरूनच दोघांची जोडी जमल्याची चर्चा जोर धरताना दिसत आहे.
याआधी शुबमन गिलचं नाव सारा तेंडुलकर आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्यासोबतही जोडण्यात आले होते. पण त्या सर्व अफाच ठरल्या आहेत.